पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कडक भूमिकेनंतर 'ड्रॅगन'चा सूर बदलला; चीन म्हणाला...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनसंदर्भात कठोर भूमिका घेतल्यानंतर जिनपिंगही काही प्रमाणात नरमल्याचं पाहायला मिळतं आहे. लडाखमधील चीनच्या या हालचाली रोखण्यासाठी मोदींची भूमिका निर्णायक ठरत असल्याची आता चर्चा आहे. भारताकडून कडक संदेश मिळाल्यानंतर आता चीननंही भूमिका बदलली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) तणाव आणि चिनी माध्यमांमधील आक्रमक वक्तृत्वानंतर चीनने आता सौम्य भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि चीनला एकमेकांना धोका नसल्याचे भारताचे चिनी राजदूत सुन वेदांग यांनी म्हटले आहे. द्विपक्षीय सहकार्याने दोन्ही देशांमधील मतभेद दूर होतील, अशीही त्यांनी आशा व्यक्त केली आहे.चिनी राजदूत सुन वेदांग यांनी दोन्ही शेजारील देशांना परस्पर संधीची आठवण करून दिली आहे. ते म्हणाले की, सामरिक भागीदारी वाढविण्यासाठी भारत आणि चीनने एकमेकांच्या विकासाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे स्थिर आहे आणि नियंत्रणात आहे. त्यानंतर चीनच्या राजदूताचे हे वक्तव्य समोर आल्यानं  त्याला  महत्त्व प्राप्त झालं आहे. या निवेदनात …

Comments