... म्हणून मी लॉकडाऊन वाढवला, उद्धव ठाकरेंची नागरिकांना भावनिक साद
देशात आणि महाराष्ट्रात लॉकडाऊनचा चौथा टप्पा आजपासून सुरु झाला आहे. त्यातच, मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनीही आजच आपल्या आमदारकीची शपथ घेतली. त्यानंतर, पहिल्यांदाच ते राज्यातील जनतेला संबोधित करत आहेत. देशात कोरोनाबाधितांचा आकडा ९० हजारांच्यावर गेला आहे. तर, राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या ३० हजार पार झाली आहे. त्यामुळे, महाराष्ट्र सरकारने चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन घोषित करत ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. आता, लॉकडाऊन वाढले असले तरी, आपण ग्रीन झोनमध्ये उद्योग सुरु करत आहोत. आत्तापर्यंत, राज्यात ५० हजार उद्योग सुरु झाले असून ६५ हजार उद्योगांना परवानगी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच, महाराष्ट्राला वाचावचंय म्हणून मी लॉकडाऊन वाढवल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना मला सांगायचं आहे, तुम्ही आत्तापर्यंत सरकारचं ऐकून महाराष्ट्र सुरक्षित ठेवला. आता, ग्रीनझोनमधील तरुणांना माझं आवाहन आहे. तरुणांनी उद्योग सुरु करण्यासाठी, उद्योगांना बळ देण्यासाठी पुढं यायला हवं, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. मोदींजींच्या भाषेत सांगायचं झाला तर, आत्मनिर्भर व्हायचं आहे
•घरात राहा सुरक्षित राहा हे आतापर्यंत पाळलं, यापुढे घराबाहेरही सावध राहा, हात सतत धुवत राहा, तोंडाला रुमाल, मास्क लावा, हात वारंवार चेहऱ्यावर फिरवू नका, हे आपल्याला पुढील काही महिने पाळावं लागेल – मुख्यमंत्री
•घरात राहा सुरक्षित राहा हे आतापर्यंत पाळलं, यापुढे घराबाहेरही सावध राहा, हात सतत धुवत राहा, तोंडाला रुमाल, मास्क लावा, हात वारंवार चेहऱ्यावर फिरवू नका, हे आपल्याला पुढील काही महिने पाळावं लागेल – मुख्यमंत्री

Comments
Post a Comment