Posts

आठवीच्या पुस्तकात चूक; भगतसिंह, राजगुरुंसह कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख, ब्राह्मण महासंघाचा आक्षेप

Image
इयत्ता आठवीच्या मराठीच्या पुस्तकात भगतसिंग, राजगुरु आणि कुर्बान हुसेन हे इंग्रजाशी लढताना फासावर गेले असा उल्लेख आहे. यावर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने याला आक्षेप घेतला आहे. पुणे :  इयत्ता आठवीच्या मराठीच्या पुस्तकात राज्य शिक्षण प्रसारक मंडळाने चूक केल्याचा दावा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केला आहे. आठवीच्या मराठीच्या पुस्तकात इतिहासकार यदुनाथ थत्ते यांचा लेख छापण्यात आला आहे. यामध्ये भगतसिंग, राजगुरु आणि कुर्बान हुसेन हे इंग्रजाशी लढताना फासावर गेले असा उल्लेख आहे. यावर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने याला आक्षेप घेतला आहे. सुखदेव यांचं नाव वगळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ब्राह्मण महासंघाचे प्रमुख आनंद दवे यांनी केली आहे. पुस्तकात उल्लेख काय? आठवीच्या अभ्यासक्रमात प्रख्यात लेखक यदुनाथ थत्ते यांचा 'भारत माझा देश आहे' या धडा आहे. या धड्यात चूक झाल्याचं समोर आलं आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु हे तीन क्रांतिकारक फासावर गेल्याचं सगळ्यांनाच माहित आहे. परंतु या धड्यात सुखदेव यांच्याऐवीज कुरबान हुसेन यांचा उल्लेख केला आहे. ...

7 दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 कोटींवर पोहोचणार? वाचा WHO चा नवा रिपोर्ट

Image
नवी दिल्ली, 25 जून :  जगभरात कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण वेगानं पसरत आहे. 180 हून अधिक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. येत्या 7 दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 कोटींवर पोहोचणार असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. या आकडेवारीबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेडरॉस अधनॉम म्हणाले की, पुढच्या आठवड्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या एक कोटींवर पोहोचू शकते. हे संपूर्ण जगासाठी रिमांइड करण्याची बाब आहे. कोरोनाची लस आणि औषधे यावर संशोधन चालू आहे. लस कधी येणार याबाबत अद्याप काही सांगता येत नाही मात्र हा वेगानं पसरणारा संसर्ग कसा रोखता येईल आणि शक्य तेवढ्या लोकांचे जीव कसे वाचवता येतील यावर विचार करणं गरजेचं आहे. हज यात्रेसंदर्भात घालण्यात आलेले निर्बंध हे संसर्गाचा विचार करून आहेत. हा निर्णय जोखीम आणि धोका लक्षात घेऊन करण्यात आला. दुसरीकडे अमेरिकेत वेगानं कोरोनाचा संसर्ग वाढत आहे आणि कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही सर्वाधिक आहे ही सर्वात चिंतेची बाब आहे. मध्य आणि दक्षिण अमेरिकेत कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका सर्वाधिक आहे. या सगळ्यात ब्रिटनने कोरोना...

आफ्रिदीपाठोपाठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अजून एका बड्या गोलंदाजाला झाला कोरोनाचा संसर्ग

Image
ढाका - कोरोना विषाणूच्या संसर्गाने सध्या संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन तसेच इतर कठोर नियमांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सध्या बंद आहे. दरम्यान, क्रिकेटपटूंनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अजून एका बड्या गोलंदाजाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.बांगलादेशचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज मश्रफे मोर्तझा यालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आफ्रिदीपाठोपाठ कोरोनाचा संसर्ग झालेला मोर्तझा हा दुसरा मोठा क्रिकेटपटू आहे. मोर्तझा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. दरम्यान, शुक्रवारी त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मोर्तझा सध्या घरीच क्वारेंटिन झाला आहे.  मोर्तझाला गेल्या दोन दिवसांपासून ताप येत होता. शुक्रवारी त्याची कोरोना चाचणी  करण्यात आली. त्याचे रिपोर्ट आम्हाला आज मिळाले आहेत. मोर्तझाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, त्याला ढाका येथील घरामध्येच क्वारेंटिन करण्यात आले आहे, कृपया त्याच्यासाठी प्रार्थना करा, असे आवाहन मोर्तझाचा छोटा भाऊ मोरसलिन ...

ऑस्ट्रेलियात सायबर हल्ला घडवल्याचा आरोप; चीनच्या 'MSS' गुप्तचर यंत्रणेबद्दल जाणून घ्या

Image
 बिजिंग=जगातील प्रत्येक देशाकडे त्यांची गुप्तचर यंत्रणा देशाच्या सुरक्षेसाठी काम करत असते, चीनमध्येही मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी म्हणजे एमएसएस गुप्तपणे कार्यरत असते, पण इतर देशांच्या तुलनेत चीनची ही यंत्रणेचे अनेक रहस्य आहेत. ना याची अधिकृत वेबसाईट आहे ना कोणते संपर्क आणि ना कोणी प्रवक्ता. याच्या बद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे, MSS चीनची मुख्य नागरिक गुप्तचर एजेंसी आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियात झालेल्या सायबर हल्ल्याला एमएसएसला जबाबदार धरलं गेले आहे.१९८३ मध्ये एसएसएसची स्थापना झाली. काऊंटर इंटेलिजेंस, परदेशी इंटेलिंजेस, राष्ट्रीय सुरक्षा, इंटरनल सिक्युरिटी यासाठी ही संस्था काम करते. इतर मंत्रालयांप्रमाणेच त्याच्या देशभरात प्रांतीय आणि महानगरपालिका शाखा देखील आहेत. सिचुआनमधील सुरक्षा दलात २० वर्षे घालवलेले एमएसएसचे अध्यक्ष चेन वेनकिंग आहेत. २०१५ मध्ये गुप्तचर यंत्रणेत जॉईन होण्यापूर्वी चेन यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या वॉचडॉगमध्ये दोन वर्षे माजी भ्रष्टाचारविरोधी अधिकारी वांग किशनचे डेप्युटी म्हणून काम पाहिले.इंटेलिजेंस एजन्सीच्या प्रतिनिधींची नावे जाहीर केली जाऊ नयेत परंतु त्याप...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कडक भूमिकेनंतर 'ड्रॅगन'चा सूर बदलला; चीन म्हणाला...

Image
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनसंदर्भात कठोर भूमिका घेतल्यानंतर जिनपिंगही काही प्रमाणात नरमल्याचं पाहायला मिळतं आहे. लडाखमधील चीनच्या या हालचाली रोखण्यासाठी मोदींची भूमिका निर्णायक ठरत असल्याची आता चर्चा आहे. भारताकडून कडक संदेश मिळाल्यानंतर आता चीननंही भूमिका बदलली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) तणाव आणि चिनी माध्यमांमधील आक्रमक वक्तृत्वानंतर चीनने आता सौम्य भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि चीनला एकमेकांना धोका नसल्याचे भारताचे चिनी राजदूत सुन वेदांग यांनी म्हटले आहे. द्विपक्षीय सहकार्याने दोन्ही देशांमधील मतभेद दूर होतील, अशीही त्यांनी आशा व्यक्त केली आहे.चिनी राजदूत सुन वेदांग यांनी दोन्ही शेजारील देशांना परस्पर संधीची आठवण करून दिली आहे. ते म्हणाले की, सामरिक भागीदारी वाढविण्यासाठी भारत आणि चीनने एकमेकांच्या विकासाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे स्थिर आहे आणि नियंत्रणात आहे. त्यानंतर चीनच्या राजदूताचे हे वक्तव्य समोर आल्यानं  त्याला  महत्त्व प्राप्त झालं आहे. या...

राज्य सरकारच्या नियमावलीत लग्न आणि अंतिम संस्काराबाबत कोणत्या अटी?

मुंबई :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात लॉकडाऊनचा (Maharashtra Lockdown 4.0 Guidelines) कालावधी 31 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यासह देशभरात चौथ्या सत्रातलाील लॉकडाऊन सुरु झालं आहे. महाराष्ट्र सरकारने चौथ्या सत्रातील लॉकडाऊनसाठी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीत लग्न समारंभ आणि अंतिम संस्काराबाबतही महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या दोन्ही कार्यक्रमात आता 50 नातेवाईकांना सहभागी होता येणार आहे (Maharashtra Lockdown 4.0 Guidelines). राज्य सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी जारी केलेले नियम 22 मे पासून 31 मेपर्यंत लागू राहतील. लग्नात 50 नातेवाईकांना सहभागी होण्यास परवानगी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात आता लग्नासाठीदेखील नियमावली जारी करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान लग्न समारंभात 50 नातेवाईकांना सहभागी होता येईल. लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त पाहुण्यांना परवानगी नाही, असं नियमावलीत स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय लग्न समारंभात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन केलं जावं, असं सांगण्यात आलं आहे. देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर...

... म्हणून मी लॉकडाऊन वाढवला, उद्धव ठाकरेंची नागरिकांना भावनिक साद

Image
 देशात आणि महाराष्ट्रात लॉकडाऊनचा चौथा टप्पा आजपासून सुरु झाला आहे. त्यातच, मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनीही आजच आपल्या आमदारकीची शपथ घेतली. त्यानंतर, पहिल्यांदाच ते राज्यातील जनतेला संबोधित करत आहेत. देशात कोरोनाबाधितांचा आकडा ९० हजारांच्यावर गेला आहे. तर, राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या ३० हजार पार झाली आहे. त्यामुळे, महाराष्ट्र सरकारने चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन घोषित करत ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. आता, लॉकडाऊन वाढले असले तरी, आपण ग्रीन झोनमध्ये उद्योग सुरु करत आहोत. आत्तापर्यंत, राज्यात ५० हजार उद्योग सुरु झाले असून ६५ हजार उद्योगांना परवानगी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच, महाराष्ट्राला वाचावचंय म्हणून मी लॉकडाऊन वाढवल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.  महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना मला सांगायचं आहे, तुम्ही आत्तापर्यंत सरकारचं ऐकून महाराष्ट्र सुरक्षित ठेवला. आता, ग्रीनझोनमधील तरुणांना माझं आवाहन आहे. तरुणांनी उद्योग सुरु करण्यासाठी, उद्योगांना बळ देण्यासाठी पुढं यायला हवं, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. मोदींजींच्या भाषेत सांगायचं झाला तर, आत्मनिर्भर व्हायचं आहे...